रेतीची वाहतुक करणारी वाहने विनानंबरची

    37

    ?आहे त्यात काहीतरी गोडमिर्ची

    ✒️खामगाव प्रतिनिधी{मनोज नगरनाईक}

    खामगाव(दि.26मे):-लाँकडाऊन असो वा नसो… या रेतीच्या गाड्या चालतात सुसाट ब्रेकर असो नसो *वेगाला मर्यादाच नाही*… हे चित्र *बुलढाणा,खामगाव राज्यभरात कुठेही पहावयास मिळते*.रेतीची अवैध असो कि वैध यासाठी या *अतितिव्र वेग हा या वाहनांना आहेच.हि *रेती वाहतुक करणारी वाहने विनानंबरची* असल्याने त्याची चर्चा जनता नेहमीच करीत आहे.विना नंबरच्या वाहनाचा पाठलाग करणारी वाहने मग *परिवहन विभाग की महसुल असो वा पोलिस* यांचे पासुन वाचविण्याचा हा प्रकार आहे.

    या रेती वाहतुकीमुळे *अमर्याद अपघात* ज्यामध्ये *पोलिस,महसुल,साधारण जनतेचा* *बळी* अथवा *दिव्यांगत्व* झालेची अनेक ऊदाहरणे असतांनाही *परिवहन विभाग* साप खाल्ल्यासारखा सुस्तावलेला पहावयास मिळत आहे.

    यासह *विना राँयल्टीची वाहने* अगणित धावत असल्याने *शासनाच्या तिजोरीवर* दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रकार *तेरी भी चुप और मेरी भी चुप या नुसार वाहतुकदारकडुन संबधित अधिकारी याचे वरदहस्ताने* चालु आहे. ते कोरोनाचा दरारा असल्याने सध्याच्या परिस्थितीला *धुम स्टाईल* वाहतुक चालु आहे.या *गौणखनिज वाहतुक*करणार्या *वाहनांचे नंबर ठळक अक्षरात दिसतील मग ते काचावर लिहा अथवा मागिल* *फालक्याला लावा* याची मागणी जनता करित आहे