मोबाइल टॉवरची अर्ज़ात माहिती मागितल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण

83

🔺आरोपीवर गुन्हा दाखल

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27मे):- नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात स्थानिक मोबाइल टॉवर विषयी माहिती अधिकार अर्ज़ात मांहिती मागितली असता ग़ैरप्रकार उघड होण्याच्या भीतिमुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याला अगोदर अर्ज परत घेण्यासाठी दबाव टाकने व नन्तर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना नवी मुंबई येथे घडली आहे .मारहाण करणाऱ्या आरोपीवर रबाले पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यामध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे .

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल प्रभाकर मोरे हे घनसोली येथील रहिवासी असून त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्थानिक परिसरात असलेल्या मोबाइल टॉवर विषयी मांहिती घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय येथे माहितीचा अधिकार अर्ज दाखल केला होता. मोरे यांनी दिलेल्या मांहिती नुसार कार्यालयातीलच काही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी संबंधित मोबाइल टॉवर संचालक मालक यांना मोरे यांचा अर्ज व अर्जदार विषयी मांहिती दिली . याचा राग धरुन निलेश साबळे नामक व्यक्तिने अर्ज करनेच्या कारणावरुन दिनांक 20/05/2021 रोजी सायंकाळी पोलिस स्टेशन परिसरातील तलाव लगतच्या गेट समोर मोरे यांना अश्लील शिविगाळ करून मारहाण केली आहे आणि यानन्तर कार्यालयात त्यांच्या टॉवर विषयी माहितीचा अधिकार अर्ज केल्यास अनिल मोरे आणि त्यांच्या महिलां सहकारीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली .

याविषयी अनिल मोरे यांनी रबाले पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून निलेश साबळे यांच्यावर कलम 323 , 504, 506 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अनिल मोरे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे क्रियाशील कार्यकर्ते , उत्कृष्ट आरटीआई एक्टिविस्ट , सामाजिक कार्यकर्ता म्हणून ठाणे आणि मुंबई जिल्हामध्ये नावाजलेले आहेत . सदरच्या घटनेमुळे जिल्ह्यातील व संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष पसरला असून भविष्यात पुन्हा अशी काही घटना अनिल मोरे यांच्यासोबत घडल्यास जिल्ह्यामध्ये कायदा व व्यवस्था संबंधी प्रश्न निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही . म्हणून या प्रकरणात दोषीवर सख्तिची व प्रतिबंधात्मक अशी कायदेशीर कार्यवाहि करावी, अशे निवेदन मांहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या राज्य कार्यकारिणी द्वारे पोलिस आयुक्त नवी मुंबई शहर , पोलिस महासंचालक, राज्य माहिती आयोग खंडपीठ कोंकण , सामान्य प्रशासन विभाग , जिल्हाधिकारी , नगर विकास विभाग मुंबई , नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले