प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव

23

✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.27मे):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन संघाचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सतीश ताके यांचा मनसे बदलापूर शहर कार्यकारिणी पदाधिकारी प्रकाश निकम यांच्या माध्यमातून नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यावेळी शाखाप्रमुख श्री लक्ष्मण गवस, सुभाष बंदरकर दळवी, विभाग प्रमुख मोहन कारखानीस, अविनाश कानापिळे दिपक वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी हा सत्कार माझा एकट्याचा नसून सर्व पदाधिकरी व पत्रकार बंधुभगिनी, संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा आहे अशी भावना सतिश ताके यांनी व्यक्त केली.

तर महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उत्कृष्ट कार्य सुरू असून त्या चांगल्या कार्याचा आम्ही गौरव करीत असल्याचे मनसे पदाधिकारी प्रकाश निकम यांनी सांगितले.

सतीश ताके यांच्या गौरवाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमारनामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दीपिका चिपळूणकर, कोकण संघटक संजय लांडगे, कोकण सचिव महेश महाजन, पंडित फंगाळ, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, ठाणे जिल्हाध्यक्ष किरण पडवळ, ठाणे जिल्हा युवा महिलाध्यक्षा ज्योती अहिरे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.