आरोग्य विभागातील कंत्राटी(NHM) कामगारांना शासकीय सेवेत कायम करा – कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेची मागणी

    36

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075786100

    म्हसवड(दि.27मे):-आरोग्य विभागाकडील सी.सी.बाहेरून भरती करण्यापूर्वी आरोग्य विभागाकडील करार पद्धतीवर कार्यरत कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याची मागणी कोरोना योध्दा कर्मचारी परिषद सातारा या संघटनेने जिल्ह्यातील विविध आमदार , मंत्रीमहोदय त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदनाव्दारे केली आहे .

    निरनिराळ्या साथीचे रोग सुरू आहेत , त्यावर नियंत्रण करण्याचे शासन प्रयत्न करत आहे.परंतु मनुष्यबळ कमी पडत असताना , सन 2007 पासून झीरो बजेट मुळे भरती झाली नाही.परंतु आता कोरोना महामारी साथीवर नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासनाने नोकरभरतीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहेच , परंतू मागील वर्षा पासून कोरोना महामारीला रोखण्यासाठी सन 2020 पासून कामावर घेतलेल्या कंत्राटी सेवकांना रिक्त जागेवर समावून घेण्यास पहिल्यांदा प्राधान्य देणे गरजेचे आहे . कारण या कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता अल्प मानधनावर रुग्ण सेवेचे व्रत प्रामाणिकपणे स्वीकारले आणि पेललेही.या सेवकांचा अनेक वर्षांचा शासकीय कामाचा अनुभव विचारात घेणे आवश्यक असून , या सर्व सेवकांना प्रशासनाने किमान वेतन सुद्धा दिलेले नसताना देखील या कर्मचारी वर्गाने अत्यंत प्रामाणिक सेवा बजावली.
    अशी मागणी कोरोना योद्धा कर्मचारी परिषद संघटनेचे सातारा अध्यक्ष सोहेल पठाण , सहसंघटन प्रमुख महाराष्ट्र श्रीनिक काळे, उपाध्यक्ष ( संघटन प्रमुख ) विटाज शेटे , महिला अभियान प्रमुख गौरी भोसले , सातारा तालुका संघटन प्रमुख सूरज शिंदे, महिला अध्यक्ष सुष्मा चव्हाण, सातारा तालुकाध्यक्ष रणजित लिंगायत, माण खटाव तालुकाध्यक्ष विशाल विरकर आदी पदाधीकाऱ्यांनी निवेदाद्वारे केली आहे.

    यावेळी अध्यक्ष (माण खटाव तालुका) डॉ.विशाल वीरकर पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचारीवर्गाला न्याय मिळावा ज्या वेळी कोविड आला त्यावेळी कोणीच येत नव्हत. अशावेळी कोवीड रुग्णाची सेवा करण्यासाठी गरिबांची मुले – मुली स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आले. ज्यांनी अडचणीच्या काळात आरोग्य विभागाचा डौलारा संभाळला अशा सर्व कंत्राटी कर्मचारीवर्गांना कायम सेवत घेऊन त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे.