शिवसेना खासदार-आमदारांनी घेतली टास्क फोर्स समिती अध्यक्षांची भेट

30

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.27मे):-जिल्हाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी काल मुंबई येथे कोवीड टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीवर चर्चा केली.बुलढाणा जिल्ह्यात कोवीड परिस्थिती हळूहळू कमी होत असली तरी अद्यापही धोका आहे.शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर व अन्य शिवसेना लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आपापल्या परीने हवी तशी मदत करत आहेत.

काल खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय रायमुलकर यांनी कोवीड महाराष्ट्र टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थिती, यंत्रसामग्री, उपलब्ध सुविधा,औषधांचा तुटवडा, आवश्यक उपाययोजना व लहान मुलांना कोरोना झाल्यावर करावयाच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा केली.