ना रावसाहेब दानवे आणि ना प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते धाड येथील आधार कोविड केअर सेंटरचे 29 में ला उदघाटन

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.28मे):- स्व दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे दि 29 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री ना रावसाहेब दानवे पाटील आणि विरोधी पक्षनेते विधानपरिषद प्रविणजी दरेकर यांच्या यांच्या शुभ हस्ते रुग्णांच्या सेवेत रुजू होणार आहे.या कार्यक्रमासाठी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष , माजी पालकमंत्री संजयजी कुटे साहेब , जिल्हाध्यक्ष ऍड आ आकाश जी फुंडकर साहेब , मा आ चैनसुखजी संचेती , बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक मा प्रशांत पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी मा सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या भव्य व प्रशस्त वास्तूमध्ये आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने शासन व लोकसहभागातून स्व दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आधार कोविड केअर सेंटर सुरू होत आहे . हे कोविड सेन्टर 50 खाटांचे सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे . कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे . यासाठी लागणारी औषधे , तपासण्या , नाश्ता , जेवण सुद्धा मोफत देण्यात येणार आहे . आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने चिखली येथे ही 50 सर्वसाधारण व 20 ऑक्सिजन खाटांचे कोविड केअर सेंटर या अगोदरच सुरु करण्यात आलेले आहे.

मार्च ,एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढलेला विळखा कमी जरी झालेला असला तरी ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी दवाखान्यात पैसे शक्य होता नाही . रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरावे लागू नये याकरिता कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना काही प्रमाणात का होईना आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने आधार देण्यासाठी धाड येथे 50 खाटांचे
” आधार ” कोविड रुग्णालय सुरू करुन त्यात मोफत उपचार देणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना फार मोठा आधार मिळणार आहे.

धाड परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा … आ सौ श्वेताताई महाले पाटील धाडला लागून जवळपास 50 ते 60 खेडे जोडलेले आहे . या भागातील नागरीकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी बुलडाणा आणि औरंगाबाद येथे जावे लागते. त्यामुळे नागरीकांना आर्थीक , मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीच्या या काळात सगळीकडे दवाखाने हाऊसफुल्ल झालेली आहेत . रुग्ण संख्या दररोज वाढत असुन बेड मिळत नाही , औषधी मिळत नाही . त्यामुळेच आधार कोविड रुग्णालय हे रुग्णांना खऱ्या अर्थाने रुग्णांवर मोफत उपचार , मोफत औषधी देऊन आधार तर देणारच आहे सोबतच दिलासा देऊन त्यांना पुरेपुर बरे करण्याचा प्रयत्न करणार आहे . त्यामुळे परिसरातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी केले आहे.
सदर उद्घाटन होणारा कार्यक्रम हा कोरोनाच्या शासकीय प्रोटोकॉल पाळून होणार आहे . या कार्यक्रमासाठी केवळ परवानगी मिळालेल्या व्यक्तींशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही .