राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कुंडलवाडी शहराध्यक्षपदी जिठ्ठावार तर उपाध्यक्षपदी मोहमद इसमाईल यांची निवड

20

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9979631332

बिलोली(दि.29मे):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडलवाडी शहर अध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष नरसिंग नरहरी जिठ्ठावार यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मोहमद इसमाईल अल्हज मो.इब्राहिम यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर , बिलोली देगलूर विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दि .२६ मे रोजी बिलोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचारा प्रमाणे पक्षाचे काम संघटना वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व पक्ष मजबूत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपून जनतेची कामे हिरीरीने निस्पक्ष करावे या उद्देशाने कुंडलवाडी शहर अध्यक्षपदी न.पा चे माजी.अध्यक्ष नरसिंग नरहरी जिठ्ठावार यांची तर शहर उपाध्यक्षपदी मोहमद इसमाईल अल्हज मो.इब्राहिम यांची निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अहेमद हुसेन बागवान , सयाराम धात्रक , रमेश पवनकर , गंगाधर खराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे मित्रपरीवारातर्फे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.