अखिल भारतीय पी सावळाराम (ऑनलाईन) मराठी साहित्य संमेलन दणक्यात साजरा

39

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.29मे):-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश आंतर्गत डोंबिवली शहर विभागातर्फे ऑनलाईन स्वरुपातून अखिल भारतीय पी. सावळाराम साहित्य संमेलन दि. २८ मे. २०२१ रोजी गुगल मीट च्या माध्यमातून दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्हातून सुमारे १०० पेक्षा जास्त कवी सारस्वत उपस्थित होते.जनकवी पी. सावळाराम यांच्या कार्याची ओळख नव्या पीढीलाही व्हावी व त्यांच्याप्रमाणे सुंदर व बहारदार गीतलेखनाकडे नवकवींचेही मन वळावे हा प्रांजळ हेतू मनात राखून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री शरद मधुकर गोरे हे या संमेलनाचे अध्यक्ष, तसेच मुंबई प्रदेश अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी सर्वानुमते सक्रीय होते. संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी काळभोर व ठाणे विभागिय अध्यक्ष बाळासाहेब तोरसकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्षा सौ. अनिता गुजर यांनी केले होते. तसेच त्यांनी सुमधूर गणेश वंदना व कार्यक्रमाचे प्रास्ताविकही सादर केले. सौ. प्रणाली म्हात्रे (विक्रोळी अध्यक्षा) यांनी सुमधूर सरस्वती वंदन सादर केले व कार्यक्रमाचे संपूर्ण ग्राफिक्सही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा सौ. मुग्धा कुंटे, सचिव दीपा वणकुद्रे, खजिनदार सौ. उज्ज्वला लुकतुके, सहसचिव अविनाश ठाकूर, सरचिटणीस नवनाथ ठाकूर यांनी अतिशय लाघवी भाषाशैलीतून केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्षा सौ. स्मिता धुमाळ यांनी अगदी आटोपशीर केले.

संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध व अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या संमेलनात प्रमुख मान्यवर कवी म्हणून सौ. जान्हवी कुंभारकर (नवी मुंबई जिल्हाध्यक्षा), सौ. शबाना मुल्ला (नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा), सौ. गीतांजली वाणी (उत्तर मुंबई अध्यक्षा), सौ. योगिता तकतराव (उत्तर मुंबई उपाध्यक्षा), सौ. कल्पना पाटकर (उत्तर मुंबई सचिव), सौ. राखी जोशी (उत्तर मुंबई सरचिटणीस),श्री विठ्ठल घाडी (उत्तर मुंबई कार्याध्यक्ष), सौ. प्रणाली म्हात्रे (विक्रोळी शहराध्यक्षा), सौ. सविता काळे (विक्रोळी शहर उपाध्यक्षा), सौ. सुलभा भोसले (राहता तालुकाध्यक्षा अ. नगर), संदीप तोडकर (मंडणगड तालुकाध्यक्ष), श्री नीरज आत्राम ( चंद्रपूर जिल्हाध्यक्ष), श्री प्रकाश पिंपळकर (चंद्रपूर जिल्हा सचिव), श्री माणिकराव गोडसे (नाशिक जिल्हा उपाध्यक्ष), श्री कुलदीप रुघे(अध्यक्ष आंबड तालुका) इ. साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.

सौ. राधिका बापट- डोंबिवली, अल्का येवले -पुणे, नूरजहॉ शेख-अकलुज, निकीता डोळे -इंदूर, प्रांजली काळबोंडे- वसई, प्रभा वाघ-पुणे, अर्चना नळगीरकर-उदगीर, वनिता पाटील -कोल्हापूर, वर्षा वराडे- पुणेे, दर्शन जोशी- संगमनेर, सायली पायील- पुणे, चंद्रकला जोशी – नाशिक, मोहना टिपणीस – पुणे, सुरेश पवार – आंबिवली, मेघना चितळे -चिपळून, सरीता कलढोणे- जुन्नर, श्वेता नाईक – पुणे, अपर्णा कुलकर्णी – नागपूर, कालिंदी वाणी – डोंबिवली, शरयू पामपट्टीवार- दिग्रस, मयूर पालकर- मुंबई, रझिया जमादार- सोलापूर, अलका पितृभक्त -जळगाव, सुरेखा मैड- नाशिक इत्यादी मान्यवर कवी -कवयित्रींनी या संमेलनात बहारदार कवितांची रंगत आणली.

अंतत: सर्व सहभागी सारस्वतांना व मान्यवर अतिथींना उत्तम व सुरेख डिजिटल सन्मानपत्रे देऊन सन्मानीत करण्यात आले.

करोनाच्या या आणीबाणीच्या काळातही तजेलदार व सकारात्मक काव्याद्वारे व अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमातून समाजमनात सकारात्मक विचारसरणीची पेरण करत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतील सर्व पदाधिकारी नव परिवर्तनाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. नवनविन उपक्रम व आधुनिक प्रणालींचा वापर करुन साहित्य सृष्टीला नविन बहर चढत आहे. मानवतेचे उदात्तीकरण करणा-या विचारधारेला काव्यरुपातून अधिक अलंकारीक स्वरुपात सजवताना येणारा काव्यानंद अनेकांना जीवन संजीवनी देत आहे.

अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करताना दु:खावलेल्या मनावर मायेची फूंकर घालता येते. असे मनोगत कार्यक्रमाच्या आयोजिका हिरकणी राजश्री बोहरा यांनी आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केले आहे. या संमेलनाचे सकारात्मक पडसाद संपूर्ण मराठी साहित्य सृष्टीवर उमटताना दिसताहेत.

*या डोंबिवली शहर विभागाच्या संमेलनाचे एक विशेष म्हणजे अखिल भारतीय पी सावळाराम काव्यसंमेलनाच्या पूर्व संध्येला पी.सावळाराम यांच्या सुमधुर गीतांचा नजराणा मुंबई प्रदेशाध्यक्षा राजश्री बोहरा, सौ. अनिता गुजर डोंबिवली अध्यक्षा, मुग्धा कुंटे डोंबिवली सहउपाध्यक्षा,दीपा वणकुद्रे डोंबिवली सचिव,अविनाश ठाकूर डोंबिवली सहसचिव,नवनाथ ठाकूर डोंबिवली सरचिटणीस यांनी स्वतः गाऊन त्याचा एकत्रित व्हिडीओ बनवून पी.सावळाराम यांच्या स्मृतीस अर्पण करून काव्यसंमेलनासाठी सर्व सारस्वतांना आमंत्रित केले. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमंत्रण करण्यात आले त्याला सर्व सारस्वतांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही संकल्पना मुंबई प्रदेशाध्यक्षा राजश्री बोहरा यांची होती.