अल्लीपुर येथिल शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या

68

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:- 9765486350

अल्लीपुर(दि.29मे):-येथील सदानंद वार्ड येथील रहीवासी शेतकरी चंद्रशेखर वसंतराव कडवे वय 33 वर्ष यांनी आज स्वताच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे.हि आत्महत्या त्यांनी सतत नापिकीमुळे वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून केल्याची गावात चर्चा आहे.मृत्यक शेतकरी शेतकरी चंद्रशेखर कडवे यांच्या नावावर तिन एकर शेतजमीन आहे. त्यांच्यावर हिंगणघाट येथील एच डी एफ सी बॅकचे साडेतीन लाख रुपयांचे पिक कर्ज आहे.सत्तची नापिकीमुळे त्यांना कर्ज भरता आले नाही.

अशातच तोंडावर आलेल्या खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे बि बियाणे खते कशी खरेदी करावी जुने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत चंद्रशेखर कडवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती मिळताच अल्लिपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथे पाठविले आहे.अल्लिपूर येथिल मंडळ अधीकारी संजय भोंग व तलाठी संदीप करनाके यांनी या घटनेचा प्राथमिक अहवाल हिंगणघाट तहसिल कार्यालयाला पाठविला आहे.पुढिल तपास अल्लिपूर पोलिस करीत आहे.