तथागताच्या जीवनावरील प्रसंग देतात अहिंसेचा संदेश – प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे

22

✒️वसमत(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वसमत(दि.30मे):-डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली.

तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती अहिंसा समता आणि बंधुत्व संदेश देतात असे विचार प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांनी व्यक्त केले.

सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुक्यातील समतादूत मिलिंद आळणे यावेळी विचार व्यक्त केले, ते म्हणाले, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिकंता येते.

गुरुनाथ गाडेकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती झूम मीटिंग द्वारे आयोजित केली होती यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रस्ताविक गुरुनाथ गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सिध्दार्थ गोवंदे सर यांनी भूषविले. मिलिंद आळणे यांनी मानले. सुरेश पठाडे, प्रणव आळणे, प्रफुल्ल पटेबहादूर, बालाजी कटारे, मंगेश गाडेकर, सुनिता आवटे, संगीता खांदळे, संस्कृती आळणे आदी उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते