दादाराव ढोले यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या विदर्भाध्यक्षपदी निवड

23

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1जून):- ऑल इंडिया पँथर सेनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी दादाराव ढोले यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. दादाराव ढोले यांनी भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात संघटन कौशल्यातून संघटन मजबूत केलं. संघटन टिकवून ठेवलं. समग्र महाराष्ट्रभर त्यांनी संघटन वाढवण्यासाठी मोठे कष्ट केले.

त्यांच्या कार्यामुळे आज विदर्भात संघटनेची मोठी ताकद वाढलेली आहे. संघटनेचा स्वाभिमानी अजेंडा, एकनिष्ठ तत्व त्यांनी आजवर पाळलं. ध्येय धोरण त्यांनी रुजवले त्यामुळे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांच्या त्यांच्या निवडीने विदर्भातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्या निवडीचे स्वागत विदर्भ संपर्कप्रमुख अविराज सावळे यांनी केले आहे.