घरोघरी जाऊन दिव्यांगांना लसीकरण करावे- मनोज नगरनाईक

32

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.4जून):-तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दिव्यांगांना लसीसाठी एकत्रीत करुन लस देण्याचे नियोजन चालु आहे आधीच आर्थिक विवंचनेत पडलेला दिव्यांग कोरोना मुळे तो व त्याचे कुटुंब हलाखीत सापडला आहे व त्यात त्याची शारिरीक प्रतिकार क्षमता कमजोर आहे तसेच परिवहन व्यवस्था बंद असल्याने त्यांचे हाल व सोबत असलेल्या सहकार्याचे हाल होणार आहे तरी या होणार्या या लसीकरण मोहिमेला ब्रेक देण्यात यावा.

डोअर टु डोअर जाण्याची संपुर्ण यंत्रणा कार्यान्वित असल्याने त्यांचे लसीकरण त्यांच्याच घरोघरी जाऊन करण्यात यावे मग ग्रामपंचायत असो कि नगरपालिका क्षेत्र असो . निवेदन मा.जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हाचिकीत्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना विराट दिव्यांग फाऊन्डेशन खामगावच्या वतिने अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी ऊपविभागिय अधिकारी महसुल यांना निवेदन दिले