मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

25

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.5जून):-विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेश चे मुखमंत्री पूज्यनिय गोरक्षनाथ पिठाधिश्र्वर महंत योगी आदित्यनाथ महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डॉ. आशिष अग्रवाल यांच्या *लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये मोफत* आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन विश्व हिंदू महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण 40 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना योग्य आणि आवश्यक तो औषधोपचार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुनील अग्रवाल, मातृ शक्ती जिल्हा अध्यक्ष सौ. अनिता देशपांडे यांनी केले. आजच्या शुभ प्रसंगी डॉ. श्री. आशिष अग्रवाल यांची विश्व हिंदू महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. ललित वर्मा, डॉ. अकिब खान, डॉ. सुशांत मुजुमले, डॉ. निखिल राठोड, कु ज्ञानेश्वरी उन्हाळे, कु. भारती राठोड, अतुल हेलोडे, सुमित बडेरे, आकाश पतोडे, मो. मोहसीन, श्रीराम धाटे, गणेश सवडतकर, राहुल अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या प्रसंगी श्री, सुनील अग्रवाल प्रदेश उपाध्यक्ष, सौ. अनिता देशपांडे जिल्हा अध्यक्ष मातृ शक्ती, नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष डॉ. आशिष अग्रवाल, श्री. मनोज गांधी, श्री यशवंत देशपांडे, सौ भक्ती वाणी, आदि मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम संपुर्णता कोव्हिड नियम पाळुन खामगाव लाईफ लाईन हाँस्पिटल येथिल कर्मचारी स्टाँप यांनी मान्यवरांचे आभार मांडले