पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावे

30

🔹पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यात वि.रा.आंदोलन समितीचे निवेदन

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.18जून):-विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 16 जूनला पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड व जीवघेण्या दरवाढी विरोधात पंतप्रधान मा.ना.नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मा.ना.धर्मेंद्र प्रधान यांना पाठविण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व पंधराही तालुक्यात तहसीलदारां मार्फत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने माजी आमदार अँड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात पेट्रोल – डिझेल – गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली वाढ त्वरित कमी करावी, अशी मागणी आज दिनांक 16 जूनला या निवेदनाद्वारे करण्यात आले.

कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे गेल्या सव्वा वर्षीपासून जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. रोजगार, व्यापार, धंदा, कारोबार, व्यावसाय सारे व्यवहार ठप्प किंवा कमी झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली व लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गॅस यांच्या किंमती सतत वाढविल्या आहेत. त्यामुळे वाहतुक खर्च वाढून परिणामी महागाई वाढली आहे. या किंमती तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना समितीचे विदर्भ अध्यक्ष माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, किशोर दहेकर,कपिल ईद्दे,मितीन भागवत,अनिल दिकोंडवार,हिराचंद बोरकुटे,पुरुषोत्तम आवळे,योगेश मुरेकर,अँड.चैताली कटलावार, नागसेन खंडार,अन्वर मिर्झा आलम यांनी निवेदन दिले. राजुरा येथे शेषराव बोंडे,प्रभाकर ढवस,रमेश नळे,मधुकर चिंचोलकर,दिलीप देरकर, भाऊजी कन्नाके, बळीराम खुजे, हसनभाई रिझवी, देवराव जूनगरी, कोरपना येथे अरुण नवले, नीलकंठ कोरांगे, अविनाश मुसळे,प्रवीण एकरे,रमाकांत मालेकर,मदन सातपुते,बंडू राजूरकर, अँड.श्रीनिवास मुसळे, बल्लारपूर येथे पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन दिले.

वरोरा येथे अँड.मोरेश्वर टेमुर्ड,सुधाकर जीवतोडे, अँड.शरद कारेकर,रमेश राजूरकर, चिमूर येथे डॉ.रमेश गजबे,अँड.मून,नरेंद्र बंडे, गोंडपिंपरी येथे अरुण वासलवार,तुकेश वानोडे,डॉ. संजय लोहे,अँड.प्रफुल्ल आस्वले,नोकेश कुत्तरमारे,अंकुर मल्लेलवार, गजानन बरडे,अँड.रूपेश सूर, बाळू नेवारे,शंकर पाल,जिवती येथे शब्बीर जागीरदार,अरविंद चव्हाण,देवीदास वारे,उद्भव गोतावळे, विजय चव्हाण, यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भद्रावती येथे सुधीर सातपुते,सचिन सरपटवार,राजू बोरकर, ब्रह्मपुरी येथे सुदाम राठोड,सौ.लीना जोगे, मुल येथे कवडू येनप्रेडीवार, सावली येथे मनोहर गेडाम, नागभीड येथे विकास बोरकर,प्रशांत वाघाये, पोंभुर्णा येथे गिरधरसिंह बैस,अशोक सिडाम, सिंदेवाही येथे सतीश पवार यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.