अजित पवारांची मिटिंग सुरू असताना बाहेरून युवकाने दिल्या घोषणा

51

🔸मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतोय

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.18जून):-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्याच्या आढावा बैठक सुरु असताना, बाहेर एका युवकाने जोरजोरात घोषणा दिल्या. दरम्यान, घोषणा दिलेल्या युवकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अजित पवार बीड जिल्ह्याच्या खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेत असताना सदर प्रकार घडल्याने काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, सदर युवकाने मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतोय, मी हात जोडून या सरकारला विनंती करत होतो असं देखील हा युवक व्हिडीओ मध्ये बोलताना आपल्याला पहायला मिळत आहे.सदर तरुणाचे नाव हनुमंत फपाळ असं आहे. मराठा क्रांती ठीक मोर्च्यांचे हनुमंत फपाळ याना जिल्हाधिकारी कार्यल्याच्या प्रांगणात अडवण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी ते जाणार होते मात्र त्यांना भेटू न दिल्याने हनुमंत फपाळ यांनी घोषणा दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे