निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे – अनुप कोहळे

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.21जून):-छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा, च्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 3 दिवशीय योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळाचे सचिव अनुप कोहळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध योगांचे प्रात्यक्षिक व त्याचे फायदे सांगितले.

फक्त आजच्या दिवशी योग करून आपले आरोग्य सुदृढ होणार नाही तर त्याकरिता नियमित योग आणि संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा लागेलं असे प्रतिपादन त्यानी केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजू सोमनकर, सदस्य आदित्य सातपुते, गणराज चीचघरे, नीरज कोहळे, आदी युवक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.