रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे पदाधिकारी जाहीर

    37

    ✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

    मुबंई(दि.२३जून):- रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे तालुका अध्यक्ष तसेच सरचिटणीस यांची आज भिम संग्राम प्रतिष्ठान, शास्त्रीनगर, वांद्रे (पूर्व) मुंबई या ठिकाणी बैठक होऊन, वांद्रे (पूर्व) तालुका अध्यक्ष म्हनून ऍड.महेश कदम तर वांद्रे (पश्चिम) तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव तर सरचिटणीस म्हणून प्रदीप मोहिते यांच्या सह कलिना तालुका सरचिटणीस पदी प्रभाकर मोरे यांची आज प्रशस्तीपत्र घेऊन पदभार घेतला.

    पद्ग्रहन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष मा.सुमित वजाळे हे होते तर सुत्रांचालन रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस मा.रतन स.अस्वारे होते, या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष जमील शेख, कलिना तालुका रिझोप चे अध्यक्ष नितीन कांबळे, रिझोप चे वॉर्ड सरचिटणीस सचिन पांचाळ, विजय साळवी, चंद्रामनी तांबे, व संदेश तांबे आदि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आभार मानून पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.