आष्टीच्या अनुष्का बेद्रेने हस्ताक्षर स्पर्धेत पटकावला राज्यात दुसरा क्रमांक

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जून):-वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी ची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी अनुष्का अनिल बेद्रे इयत्ता पाचवी हिने बालसंस्कार समुह आयोजित राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मोठ्या गटातून (इयत्ता पाचवी ते आठवी) द्वितीय क्रमांक पटकावून राज्यामध्ये वसुंधरा शाळेचे नाव गाजवले आहे.यापूर्वी अनुष्काने राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जवळ जवळ सात वेळा यश संपादन केले आहे.तिच्या या यशाबद्दाल आष्टी पं स.चे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी झाड देवून सत्कार केला.

सुंदर हस्ताक्षर ही कला आहे आणि ही कला आपण सरावाने साध्य करू शकतो याच प्रमाणे अनुष्का रोज एक तास सराव करते.त्याचबरोबर कॅलिग्राफी लेखनही उत्तम प्रकारे करते.कोरोना महामारीत शाळा बंद आहेत.त्यामुळे मुलांचे लेखन कमी झाले आहे.या कारणाने हस्ताक्षर म्हणावे तशे चांगले राहिले नाही,शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन विविध स्पर्धा होत असतात,अशाच प्रकारे बाल संस्कार समूह महाराष्ट्र यांनी राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना लेखन कला विकसित करण्याची प्रेरणा दिली.

या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मोठा गट व लहान गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित केली होती.मोठ्या गटात जवळजवळ ३५०० अक्षरांचे नमुने आले होते.या नमुन्या मधून अनुष्काचे सुंदर हस्ताक्षर पाहून आयोजक प्रभावित झाले व त्यांनी इतर स्पर्धकांच्या तीन दिवस अगोदर अनुष्काचा नंबर जाहीर केला ही या स्पर्धेमधील विशेष गोष्ट म्हणावी लागेल.सुंदर हस्ताक्षर कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे इयत्ता पाचवीत शिकणारी चिमुरडी अनुष्का अनिल बेद्रे.राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब,शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आँनलाईन बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

अनुष्काच्या या उत्तुंग यशाबद्दल जेष्ठ शिक्षण विस्तारअधिकारी तथा वसुंधरा संस्थेचे संस्थापक मनोरंजन धस साहेब यांनी अनुष्काचे भरभरून कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथील सर्व शिक्षक वृंद व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोंदार्डे मॅडम यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून सर्व पत्रकार मित्र,मित्रपरिवार व वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी अनुष्काचे अभिनंदन केले आहे.