बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी

30

✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपूर(दि.27जून):- बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधान सभेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले की,छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी अवघ्या ४८ वर्षांच्या अल्प जीवनकाळात व २८ वर्षाच्या राज्य कारभारादरम्यान केलेली युगप्रवर्तक कामांची यादी अचंबित करणारी आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद, आंतरजातीय विवाहाला मान्यता देत स्वत:च्या राजघराण्यात आंतरजातीय विवाह सोहळे आयोजीत करणे,
पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहीलेल्या बहुजनांमध्ये शिक्षण प्रसारासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा करत गावोगावी शाळा वसतिगृहे काढणे,भटक्या जमातींना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता त्यांना घरे बांधून देत शासकीय नोकऱ्या देण्याची पाऊलं ऊचलणे ही काही प्रातिनिधीक ऊदाहरणं. राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील गोरगरीब कुटुंबातील तसेच मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अतुलनीय असे कार्य केले.

गरिबांना मोफत शिक्षण व राहण्यासह खाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. तीच व्यवस्था आजही सुरु आहे. महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज समाजातील गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी देशाचे नावलौकिक वाढवीत आहेत. कोरोना सारख्या महामारीला हरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिर्डी लोकसभा प्रभारी राजु खरात, तालुका सचिव अरुण हिवराळे, तालुका कोषाध्यक्ष एकनाथ पवार, बेलापूर शाखाध्यक्ष बापू भगत, श्रीरामपूर शहर संघटक कुष्णा कदम, संजय सूर्यवंशी. शहर सदस्य भाऊसाहेब यादव, रवी आमोलीक आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.