ओबीसी चे राजकीय आरक्षण पुर्ववत करा – समस्त माळी समाजाची मागणी

21

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.29जून):-येथिल माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळी वाडा पंच मंडळाकडुन तहसीलदार यांना ओबिसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका मध्ये मिळणारे राजकीयआरक्षण पुर्ववत मिळावे. तसेच ओबीसी संवर्गातील जातींची जनगणना करण्यात यावी या मागणी साठी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, रामकृष्ण माळी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपा ओबिसी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन यांचा हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष, निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, सचिव दशरथ महाजन, सुधाकर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, सहसचिव डिगंबर माळी, राजेंद्र मांगो महाजन तसेच समाजाचे विश्वस्त शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र किसन महाजन, भाजपाचे गट नेते कैलास माळी, युवा क्रांती मंच अध्यक्ष आर.डी.महाजन, बहुजन क्रांती मोर्चाचे ता. संयोजक आबासाहेब वाघ, नगरसेवक विजय महाजन, विलास महाजन, सुरेश महाजन, राष्ट्रीय किसान मोर्चा ता.अध्यक्ष गोरख देशमुख, सुकदेव महाजन . युवा सेना प्रमुख संतोष तायडे, कॉग्रेस चे सरचिटणीस नंदलाल महाजन,हेमंत माळी, पी.डी. पाटील, राजेंद्र लोटन महाजन,सुभाष महाजन, फुले ब्रिग्रेड चे डॉ. धनराज देवरे, मनोज माळी, नरेंद्र ( राजु ) माळी, रविंद्र माळी, प्रविण माळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माळी समाजाचे सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी यांनी परिश्रम घेतले.