कुंडलवाडी येथील पोस्टमन मोहमद अहेमद मोहीयोदीन पाशामियॉ सेवानिवृत

27

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.1जुलै):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील पोस्टमन पदावर कार्यरत असलेले मोहम्मद अहेमद मोहियोदीन ऊर्फ पाशामियाॅ हे नुकतेच डाक सेवेतुन निवृत झाले असुन कुंडलवाडी येथील ऊर्दू विद्यालयात त्यांना नांदेड जिल्हा डाक सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.कुंडलवाडीचे भुमिपूत्र गेल्या ४२ वर्षापासुन डाक सेवेत कार्यरत असलेले पोस्टमन मोहमद अहेमद मोहीयोदीन ऊर्फ पाशामियॉ हे प्रदिर्घ सेवेतुन निवृत झाल्याने कुंडलवाडी पोस्ट कार्यालय यांच्या वतीने आज दि.३० जून २०२१ रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे आयोजन ऊर्दू विद्यालयात करण्यात आले होते.

यावेळी डाक कर्मचारी यांच्या वतीने भेट वस्तु व मान्यवर शहरातील नागरीकातर्फे यथोचित सत्कार करून निरोप देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुभाषराव गायकवाड तर प्रमुख पाहुणे मिलिंद देवूळकर,प्रकाश जाधव,हणमंत जामनोर,आय.जी.पठाण,सुरेश रोडेवाड,गंगाधर भिलवंडे,माजिद नांदेडकर आदी उपस्थित होते.

पोस्टमन पाशामिया हे गेल्या ४२ वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात आपली प्रामाणिक व प्रांजळपणे सेवा करून नागरीकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.त्यांच्या सेवानिवृत्ता निमित्त कार्यक्रमाला शहरातील ,राजेश्वर कनकमवार,महेश शिंदे,सेवानिवृत्त मॅनेजर वजिर अहेमद,अनवरउल्ला खान,शेख वाहाब,शेख उसमान अल्ला बखश,वाजिद कासार,आमद भाई,बासिद टेलर,सिराज पट्टेदार,शेख इब्राहिम बाबू भाई,रामा हतोडे,पांडू दिमलवाड,हणमंलू कोणेरवार,आदीसह शहर व परिसरातील पोस्ट अधिकारी कर्मचारी,मित्रपरीवारीतील मंडळी व पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शुभेच्छा दिले,हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर साखरे,अमर ठाकुर,अशोक तुम्मीदवार,रमेश शटीवार,विठ्ठल शिरगिरे,डी.एन.भंडारे,श्रावण बंडेवाड,विकास कुलकर्णी महेश शिंदे,शेख अजीम, आदींनी परीश्रम घेतले,हे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शंकर साखरे यांनी मानले.