आई सफाई कामगार तर मुलगा स्वच्छता सभापती..

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जुलै):-नगर परिषद मध्ये उषाबाई रामराव खंदारे या स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात तर याच नगरपरिषदेच्या सभागृहात त्यांचा मुलगा चंद्रकांत रामराव खंदारे हे स्वच्छता सभापती आहेत..असा हा योगायोग केवळ गंगाखेडच नाही तर मराठवाडय़ात आला असेल याची शक्यता कमी आहे.मुलगा अधिकारी तर बाप कर्मचारी एकाच कार्यालयात असलेले अनेक उदाहरणे पहायला मिळतात. उषाबाई या नगरपरिषद मध्ये सफाई कामगार तर रामराव खंदारे हे टेलरिंग व्यवसाय करायचे त्यात ही त्यानी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतले त्यांचा एक मुलगा जनाबाई महाविद्यालय येथे क्लार्क म्हणुन सेवेत आहेत तर विद्यमान स्वच्छता सभापती चंद्रकांत खंदारे हे पेंटींग व्यवसायात रमले होते. त्यांनी आपला व्यवसाय करीत सामाजिक कार्य करत होते.

त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या त्यांच्या वर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली ती त्यांनी उत्तम रित्या सांभाळली आणी सन 2011/12 मध्ये नगरपरिषद च्या निवडणुकीत नशीब आजमावले पण राजकारणात नवनिर्माण सेनेच्या नवख्या पणाचा आणी राजकारणातील गटातटाचा जाती पातीच्या राजकारणाचा फटका सहन करावा लागला आणी पर्यायाने पराभवाचे तोंड बघावे लागले. पण त्यांनी आपले सामाजीक काम अधिक जोमाने सुरू ठेवले या कामाची दखल घेऊन त्यांना विध्यमान नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यानी 2016 च्या नगरपरिषदे च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणुकीची संधी दिली आणी विजयश्री खेचून आणली . नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत. जनतेच्या प्रश्नासाठी कायम तत्परतेने पुढाकार घेत प्रभागातील रोड नाली लाईट अशा मुलभुत सुविधा मिळवुण दिल्या आणी आता ही त्यासोडवत आहेतच कारण अडचणी आणी प्रश्न हे संपत नसतात तर त्या नव्याने नव्या रुपात येतात याची जाणीव चंद्रकांत खंदारे याना आहे या प्रवासात त्यांना मोलाची साथ आणी मार्गदर्शन नगरअध्यक्ष विजयकुमार तापडिया याचे आहे. हे ते कबुल करतात.

ज्या नगरपरिषद मध्ये आजही आपली आई स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते त्याच नगरपरिषद च्या सभागृहात मुलगा स्वच्छता सभापती म्हणून काम पाहत आहे याचा गर्व त्या माऊलीला तर आहेच पण स्वच्छता सभापती चंद्रकांत खंदारे यानां ही आहे आणी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या व्यथा वेदना अडचणी काय आहेत हे त्यांनी आईच्या तोंडुन सभापती नसताना ऐकल्या आहेत त्याची झळ सोसली आहे कामगारांना न्याय कसा मिळेल आणी तो कसा मिळवायचा हे वेगळे सांगायला नको म्हणून आईच्या हातात झाडु तर मुलाच्या हातात कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा अधिकार आहे. असा हा दुर्मिळ योग आहे.राजकारणात प्रामाणिकपणे काम केले तर लोक नक्की दखल घेऊन पावती देतात त्या मुळेच आज सफाई कर्मचारी असलेल्या उषाबाई चा मुलगा सफाई सभापती झाला.