राजकीय नेत्यासह आमदाराच्या बेजबाबदार पणामुळे नायागांव विधानसभा मतदारसंघ वाऱ्यावर ; पुढारी बंगल्यावर – माधव पवार रुईकर

24

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नायगाव(दि.2जुलै);-विधानसभा मतदार संघाच्या विकासाची चांगलीच विल्हेवाट लागली असून या विभागाच्या आमदारानी विधानसभा निवडणुकीत नायगाव, धर्माबाद उमरी तालुक्यातील गावागावात कार्यकर्त्यां मार्फत निवडणुकी पूर्वी रंगीबेरंगी छेत्र्या वाटप केल्यामुळे आमदाराच्या देखाव्याला जनता चांगलीच बळी गेली परंतु भविष्यात या मतदारसंघाच काय होणार यांचा विचार बाजूला ठेवून मोठया मतधिक्याने विधानसभेच्या निवडणुकीत मतदारानी निवडून दिले असताना सुद्धा या मतदार संघाकडे बेजबाबदार डोळे झाक केल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नायगाव विधानसभा मतदार संघ हा वाऱ्यावर आमदारानी सोडले असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे

राजकीय नेते निवडणुकीत मोठ मोठाले आश्वासने देऊन मतदाराची तसेच जनतेसह शेतकऱ्याची दिशाभूल करतात केली जाते आणि निवडून गेल्यावर कोणतेच नीट कामे व विकास करण्यासाठी तयार नसतात आपल्याच तोऱ्यात फिरताना दिसतात अशाच पद्धतीने नायगाव विधानसभा मतदार संघात पुढारी पौर्णिमेला व अमावस्याला येताना दिसून येतात निवडणुक काळात पुढारी नागरिकाचा शोध काढीत गल्ली गल्लीत बोळी बोळीत फिरतात आणि आता निवडून गेलेल्या नेत्याच्या शोधात जनता फिरत असताना दिसून येत आहे

नायगाव विधानसभा सभा मतदार संघातील बरबडा वाडी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येते परंतु येथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाल्यामुळे नागरिकाला चिखलातुन जाताना डोळ्यात पाणी येत असताना सुद्धा या विभागाचे आमदार बे फिकिर कसे असा प्रश्न जनतेत निर्माण झाला असून सर्वात महत्वाची बाब म्हणजे बरबडा ते बरबडा हा आमदार राजेश पवार यांच्यासह जिल्हा परिषद विभागाने लक्ष घालून नागरिकाची होणारी गैरसोय टाळावी असे ही गाववासियातुन बोलल्या जात आहे

ग्रामीण भागातील रस्त्याचा पाढा घुंगराळा ते बळेगाव आणि रुई बु, बरबडा ते आंतरगाव, रुई बु कुंडवाडी रस्ता, कुंटूर ते सालेगाव, डोंगरगाव, दुगाव, कुंटूर ते कोकलेगाव, शेळगाव छत्री, घुंगराळा ते सावरखेड व आंतरगाव रस्ता बरबडा ते वजीरगाव मधला मार्ग कुष्णूर ते बरबडा असे अनेक रस्ते आहेत की ते मोजता येत नाहीत असे असताना नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार संघातील संबंधित जिल्हा परिषदचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे