वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंती निमित्त रक्तदान व मोफत रक्त तपासणी शिबिर

31

🔸पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्सचे आयोजन

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.2जुलै):- हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या १०८ वी जयंती तसेच पुरोगामी पत्रकार संघ राजुराचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांच्या जन्मदिनाचे संयुक्तरित्या औचित्य साधून कृषी दिनानिमित्त आज रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह, साई नगर लेआऊट, शिवाजी वॉर्ड क्रं.९ राजुरा येथे सदर शिबिर पार पडले.

कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या उक्तीप्रमाणे पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्स राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नव्याने रक्तदान करणाऱ्या तरुण युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी २२ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. राज्य रक्त संक्रमण परिषद चंद्रपूरचे जय पचारे व चमूने मोलाचे सहकार्य केले. यावेळी राजुरा येथील हरहुन्नरी युवक महेंद्र सेपूरवार यांचे काल अपघाती निधन झाले. यावेळी त्यांना उपस्थितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शिबिरात रविकिरण बावणे, उत्कर्ष गायकवाड, धनराज उमरे, राहुल अंबादे, सतीश कांबळे, गौरव रामटेके, प्रतीक कावळे, संयोग साळवे, राहुल भागवतकर, तुषार पाझारे, आदर्श तेलंग, अनिकेत साळवे, हर्षल गाले, आकाश नळे, आकाश येगेवार, जय खोब्रागडे, जतीन इंमुलवार, विजय मोरे, अक्रम शेख, रुपेश मेश्राम आदीनी उपस्थित राहून सहकार्याची भूमिका बजावली.