महावितरणने वीज खंडित करू नये, वीज बिलात सवलत द्यावी

22

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

नालासोपारा(दि.4जुलै):- शहरात लॉक डाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यातच महावितरणचे बिल भरमसाठ येत असल्याने नागरिक ही हैराण झाले आहेत. महावितरणने वीज बिल भरले नाही म्हणून मीटर जोडणी खंडित करू नये तसेच वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रक वसईतील महावितरणाच्या मुख्य कार्यालयात देण्यात आले आहे.

कोरोनामुळे राज्यात गेले दोन वर्ष लॉकडाउन सुरू असून त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ आली असून सध्याची परिस्थिती पाहता महावितरणने वीज बिलात सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, शिवाय वीज बिल भरले नाही म्हणून वीज जोडणी खंडित करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिका अध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या सचिव रेणुका सचिन जाधव यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन वसई येथील महावितरण कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी सचिव रेणुका जाधव, दुर्गा कांबळे, स्नेहलता कनोजिया व दिलिशा वाघेला उपस्थित होत्या.