राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

    36

    ?राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.6जुलै):- साप्ताहिक शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.

    कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असतांना सुध्दा राज्यातील शिक्षक ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवीत आहे.प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल शासनासह सर्वांनी घ्यावी आणि त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे याच प्रामाणिक हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे आहे.राज्यातील शिक्षकांमधून सात गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.अंगणवाडी गट, प्राथमिक गट (पहिली ते चौथी), माध्यमिक गट (पाचवी ते दहावी) उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावी), मुख्याध्यापक (गट)शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी (गट), शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ति (गट)सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

    सद्याच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
    उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
    उपक्रमाचे शीर्षक, उपक्रमाची गरज व महत्त्व,उद्दिष्टे, नियोजन/प्रत्यक्ष कार्यवाही, यशस्विता/निष्कर्ष, फायदे, परिशिष्टे, उपक्रमाची सद्यस्थिती, पीडीएफला स्वतःचे नाव व गट नंबर असे द्यावे, स्वत: राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र, या मुद्द्यांचा समावेश असावा.

    अधिक माहितीसाठी www.shikshakdhyey.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

    शिक्षकांनी आपल्या उपक्रमाच्या अहवालाची पीडीएफ 7499868046 या नंबरवर व्हाट्सएपने पाठवायची आहे.
    उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 आहे. स्पर्धेचा निकाल शिक्षक दिनी जाहीर करण्यात येईल. नमुना उपक्रमासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
    https://drive.google.com/file/d/1wifHGfWPC099Gm-SBbBN15uIX3tXov8D/view?usp=drivesdk

    प्रत्येक गटातील प्रथम दहा उपक्रमशील शिक्षकांना आणि प्रत्येक गटात तीन उत्तेजनार्थ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र कुरिअरने पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मेलवर/व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.या स्पर्धेत दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल. राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे यांनी केले आहे.