मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी बळवंत मनवर यांची निवड

56

✒️बाळासाहेब ढोले(प्रतिनिधी पुसद)

पुसद(दि.10जुलै):-तालुक्यातील मोहा (ई) येथील ग्रामीण भागात राहणारे चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते बळवंत नामदेवराव मनवर यांची मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सोबतच बळवंत नामदेवराव मनवर यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य म्हणजे शोषित,श्रमिक पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक,अत्याचार, शोषित,गुलामगिरी, दहशत, मागासवर्गीय होणारा अन्याय, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातील होणारी पिळवणूक,मानवी हक्काचे उल्लंघन,शासकीय अधिकाराचा गैरवापर यासह अनेक कार्यात सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.तसे नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.

तर स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड झालेले बळवंत मनवर यांचा पुसद तालुक्यासह संपूर्ण विदर्भामध्ये इच्छुकांना जोडण्याचे काम त्यांच्या हातून होणार आहे.त्यांची विदर्भ अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव पां. शेलार यांनी नुकतेच दिले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असलेले बळवंत मनवर यांना दोन नियुक्त्या मिळाल्याने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.