प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी जाणून घेतली पारधी कुटुंबाची व्यथा

    40

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.10जुलै):- शिरूर तालुक्यात पारधी समाज हा अनेक गावांत विखुरलेला असून पारधी समाजाची लोकसंख्या ही बऱ्यापैकी आहे हा समाज गावाच्या बाहेर पाल व पत्र्याचे शेड मारून राहत असून, हाताला मिळेल ते काम करून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करीत असतो, पण या समाजाच्या व्यक्तींना शिक्षण, काय असते ते माहीतच नसल्याने, हा समाज शिक्षणापासून वंचित आहे. पूर्वी या समाजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात असे.

    आज सद्यस्थितीत या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे मुख्य उद्देश असावा म्हणून पारधी समाजाची दशा व व्यथा जाणून घेऊन यांना मार्गदर्शन करण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते तथा सेवाधाम ट्रस्टचे अधीक्षक सदाशिव कांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना भ्रमणध्वनीद्वारे विनंती केली असता, संघाचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी ताबडतोब सदाशिव कांबळे यांच्यासह करंदी गावाची भेट घेतली. भेटीदरम्यान करंदी गावच्या पारधी समाजातील प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पारधी समाजातील कुटुंबांनी आपल्या व्यथा सांगितल्या, ते म्हणाले की, ‘इतर समाजाप्रमाणे आम्हाला समाजात सामावून घेण्यात यावे.

    गावात राहण्यासाठी घरे बांधून देण्यात यावे, गायरान जमिनी देण्यात याव्यात, जातीचे दाखले मिळवून देण्यात यावे’. अशा अनेक समस्या कथन केल्या. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले असले तरी आम्हाला अद्याप स्वातंत्र्य मिळालंच नाही अशा भावनाही व्यक्त केल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली असता पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ प्रयत्न करेल अशी ग्वाही लक्ष्मण कांबळे यांनी दिली.