प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

21

🔸स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे केले होते आयोजन

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.12जुलै):-स्व.सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे लोकमतचे स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेशदादा जाधव व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजीत मोरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी डाॅ. नागेश महामुनी, रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात कराडसह संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा अडचणीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान अपेक्षित असल्याने दैनिक लोकमतचे स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.