माण कृषी उत्पन्न बाजार समीतीचे १०२ अर्जापैकी २ बाद १०० वैद्य

30

🔹हमाल मापाडी उमेदवाराने जिल्हा उपनिबंधक यांचेकडे धाव

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.14जुलै):-म्हसवड प्रतिनिधी – माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखला करण्याच्या शेवटच्या दिवसी १८ जागेसाठी १०२ इच्छूकांनी आपले विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला भलतीचं रंगत आली असुन हमाल माथाडी उमेदवाराने दोन अक्षरे भरले होते त्यास हमाल मापाडीचा एक ही सदस्य सुचकसाठी नसल्याने ते दोन्ही आर्ज बाद झाल्याने १०० अर्ज शिल्लक राहिले असले तरी बाद झालेल्या उमेदवाराने जिल्हा उपनिबंधक यांचेकडे धाव घेतली आहे राज्यात असलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय कांग्रेस व शिवसेना या आघाडीच्या सरकारचा सुर माण मध्ये गवसणार का आमचं ठरलंय मधील वेग वेगळ्या नेत्यांनी वेग वेगळे उमेदवारी दाखला केले होते.

आज मंगळवारी झालेल्या अर्ज छानणीत २ बाद तर १०० अर्ज वैध ठरले मात्र हमाल मापाडीचा एकच सदस्य असल्यानेही या जागेसाठी एकमेव अर्ज दाखल केला मात्र सुचक व अनुमोदक हे दोन ही सदस्य सोसायटी मतदार संघातील सदस्यांनी उमेदवारी अर्जावर सही केल्याने निवडणूक अधिकारी विजया बाबर यांनी तो अर्ज बाद केला होता त्या नंतर हमाल मापाडीचे उमेदवार यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक यांचेकडे अपिल दाखल केल या जागेचा निर्णय होणार असल्याने काय होणार याकडे लक्ष लागून राहिले असले तरी राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय कांग्रेस, शिवसेना, अनिल देसाई, भाजपा व अपक्ष असे १०२ अर्ज दाखल झाल्याने उद्या किती अर्ज बाद होतात व अर्ज मागे घेण्याच्या दिवसी कोण कोण माघार घेणार कोण कोण रिंगणात उतरण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

माण बाजार समितीचे १८ कारभारी २०६५ मतदार ठरवण्यासाठी काल १०२ उमेदवार अर्ज दाखल झाले सोसायटी मतदार संघातून ८९५ मतदार ११ संचालक निवडून देणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, दोन जागा महिलांसाठी, इतर मागास प्रवर्ग साठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी एक जागा आरक्षित आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून ८३५ मतदार ४ संचालक निवडून देणार आहेत. व्यापारी व आडते मतदार संघातून ३३४ मतदार २ संचालक निवडून देणार आहेत.तर हमाल तोलारी मतदार संघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून त्यासाठी फक्त एकच मतदार आहे.आणी त्या एका मतदाराने आपले दोन अक्षरे दाखल केले त्या उमेदवार अर्जावर सुचक व अनुमोदक म्हणून सोसायटी मतदार संघातील मतदारांनी सह्या केल्याने आज छावणीत तो अर्ज बाद करण्यावरुण उमेदवाराने सातारा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असुन सायंकाळी उशीरि यावर तातडीच्या न्यायालयात निकाल होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी मोठा असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा कशा पदरी पडतील याची व्यूव्ह रचणा करण्यात गुंग झाले असुन. शेवटच्या क्षणी कोणत्या गटांसाठी कोणाची उमेदवार ठेवायची हे बैठकीस बसल्यावर कोणाला कोणती जागावाटपा करायची या नंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे निवडणूक चौरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी होतेय की तिरंगी हे त्याचदिवशी समजेल.तोपर्यंत तरी सर्वच उमेदवार बाजार समितीत जाण्याची स्वप्न रंगवणार हे मात्र नक्की ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.