भारतीय स्टेट बँक शाखा गंगाखेड समोर थाळी नाद आंदोलन

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14जुलै):-पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय स्टेट बँक शाखा गंगाखेडचे विरोधात डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्यांचे थाळी नाद आंदोलन करण्यात आले.गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील आसनारऱ्या डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेकडे पिक कर्ज मागणीसाठी मे 2021 महीण्यापासुन मागणी अर्ज करुनही तीन महिने झाले तरी डोंगरगाव येथील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँकेकडून आद्याप एकाही शेतकऱ्याला पिक कर्ज देण्यात आले नाही.

पिक कर्ज मागणीसाठी शेतकरी बॅंकेत गेल्यावर बँक व्यवस्थापनाकडुन तुम्हाला फोन करून सांगितले जाईल असे तीन महिन्या पासून सांगितले जात असुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात jअसुन शेतकऱ्यांना आर्वाच भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देऊन गार्ड मार्फत हाकलून दिले जात आहे. डोंगरगाव येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज येत्या आठ दिवसात देण्यात यावे. आठ दिवसात पिक कर्ज न मिळाल्यास डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने डोंगरगावच्या शेतकऱ्यांचे भारतीय स्टेट बँकेच्या समोर दि.26.07.2021.रोजी थालीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आले.

निवेदनावर डोंगरी विकास जन आंदोलनचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे, आश्रोबा सोडगीर, पंडितराव सोडगीर, दत्ता आयनीले, बालासाहेब सोडगीर, गोविंद सोडगीर, बबन सोडगीर, राजेभाउ आयनीले, माधव सोडगीर, दत्तराव गाडे, नरहरी बरले, भास्कर सोडगीर आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.