नेर येथे परिसरात 35 वृक्ष रोपांची लागवड

17

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.15जुलै):-धुळे तालुक्यातील नेर येथे गावातील ठिक ठिकानी तब्बल 35 वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. नेर येथील गावातील उद्योक दिपक खलाणे यांचा स्वखर्चातून मोलाचा वॄक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच नेर परिसरात वृक्षाची लागवड हि स्मशानभूमी परिसर तसेच पांझरा नदी काठी ,चंदन टेकडी परिसर, रस्ता या भागात पिंपळ 20,वड 5,निंब 10, एकूण 35 वृक्षाची रोपांची लागवड करण्यात आले. लागवडी साठी झाड,लोखंडी जाळी,तार अशाप्रकारचे संपुर्ण झाडाचे बजेट काडून वॄक्ष लागवड करण्यात आले. तसेच नेर गावातील वैकुंठधाम येथे बर्याच दिवसापासून वृक्षाची रोपे लावण्यासाठी व ते अंतिम धाम सुंदर असावे असा बरेच लोक विचार करत होते.

ह्या गोष्टींचा विचार करुन नेर येथील उद्योजक दिपक दादा खलाणे यांच्या सहकार्याने वृक्ष रोपण केले.व तो भाग सर्व गावकर्याच्या सहभागाने नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे. पैलाड जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला एक नम्र विनंती आहे झाडांच्या संगोपन साठी येता जाता लक्ष देऊन पावसाळ्या नंतर एक डबा पाणी टाकण्याची कृपा करावी.यावेळी.दिपकभाऊ खलाणे ,डाँ.सतीष बोढरे,संतोष ईशी,बापू मेम्बंर,दिपक बोढरे ,पिन्टूंभाऊ देवरे ,शंकर कोळी,राकेश आहिरे, बापू आहिरे रामा खलाणे, आनंदा साळुंखे, सर्व वृक्ष प्रेमि व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.