गंगाखेडला वृक्षारोपण आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान करत आषाढी साजरी

21

🔹सवंगडी कट्टा, साईसेवा प्रतिष्ठाणचा उपक्रम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20जुलै):-आषाढी वारी दरम्यान पंढरपुरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा सवंगडी कट्टा या समुहाने जपली आहे. यंदा वारी रद्द झाल्याने ती सेवा घडली नसली तरी शासकीय रूग्णालयात वृक्षारोपण आणि कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करत आषाढी साजरी करण्यात आली. सवंगडी कट्टा समुह आणि साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतीने हा ऊपक्रम राबवण्यात आला.

गंगाखेडचे ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना सन्मानपत्र आणि विठ्ठल – रूक्मीनी मुर्ती भेट देवून गौरविण्यात आले. गंगाखेडकरांकडून मिळालेला हा सन्मान संस्मरणीय असल्याचे मनोगत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. तहसीलदार स्वरूप कंकाळ, डॉ. हेमंत मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढेही सावधानता बाळगण्याची गरज प्रतिपादीत केली. तर पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी कोरोनाकाळात सर्वांनी शिस्त पाळण्याची नितांत गरज असल्याचे सांगीतले.

सन्मानपत्राचे वाचन साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. प्रास्तावीक प्रा. डॉ. मुंजाजी चोरघडे यांनी, सुत्रसंचालन मनोज नाव्हेकर यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब राखे यांनी केले. सामाजीक वनीकरण अधिकारी महादेवी गिरी, सवंगडी कट्टा समुहाचे संयोजक रमेश औसेकर, सामाजीक कार्यकर्त्या मंजू दर्डा, शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे,लॉ. संतोष तापडिया, माधवराव शेंडगे, प्रकाश घन, डॉ. संजय भरड, डॉ. चट्टे, डॉ. भारत भोसले, डॉ. अर्जुन सोनवणे, नागेश पैठणकर, डॉ. पारस जैन, सुहास देशमाने, गजानन महाजन, साहेबराव चौधरी, गोविंद रोडे, आर. डी. भोसले, अतुल तुपकर, दिलीप सोळंके, राजाभाऊ फड, संतोष मुंडे, अक्षय जैन, पंकज भंडारी, दत्ता यानपल्लेवार, रामेश्वर भोसले, ईंद्रजीत जाधव, आबा शिंदे, नागेश कोनार्डे, अक्षय जैन, सुजाता पेकम आदिंसह बहुसंख्य सदस्यांची ऊपस्थिती होती.

*लेडी सिंघम बोरगावकर गहिवरल्या…*
गंगाखेडच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या कडक शिस्तीच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रसिद्ध आहेत. आजच्या सत्कारानंतर आपले अनुभव कथन करताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. सुधीर पाटील यांच्या बहिनीचे नुकतेच निधन झाले. माझ्या घरातील दोन सदस्य कोरोनाने हिरावून नेले, मी स्वतः कोरोना बाधीत झाले. ही वेळ ईतर कोणावर येवू नये, यासाठी प्रसंगी हातात काठी घ्यावी लागली, हे सांगताना बोरगावकर यांचा कंठ दाटून आला होता. तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच कठोर व्हावे लागत असल्याचे बोरगावकर यांनी सांगीतले. कडक शिस्तीच्या वसुंधरा बोरगावकर यांच्या हळव्या मनाचा हा कोपरा पाहून ऊपस्थित सर्वच काही काळासाठी स्तब्ध झाले होते.