महात्मा फुले हायस्कूल शाळेतील रोहीत पटुणे चा छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराने सन्मान

30

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.22जुलै):- दि. २२ जुलै , २०२१ गुरुवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील सन – २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षात शाळेतून मागासवर्गीयातून प्रथम येणारा रोहित मनोज पटुणे या विद्यार्थ्याला “छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक वर्ग १०वी चे वर्गशिक्षक पी.डी.पाटील यांनी केले.जळगाव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव तर्फे सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील विद्यार्थी रोहित मनोज पटुणे वर्ग १० वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार ५ हजार रुपये धनादेशाचा स्वरूपात देण्यात आला.

समाज कल्याण विभाग जळगावचे मा.योगेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून तालुका समन्वयक किशोर माळी साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे मॅम यांच्या हस्ते या धनादेशाचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी तालुका समन्वयक किशोर माळी साहेब यांनी पुरस्काराविषयी विस्तृत अशी माहिती शाळेतील शिक्षकवृंद यांना दिली. व गुणवंत विद्यार्थी रोहित पटूणे याचे कौतुक केले.याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक किशोर माळी साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे.एस. पवार ,ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे, वर्गशिक्षक पी. डी. पाटील, एस.व्ही.आढावे, व्ही.टी.माळी तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.