गांगलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पँनेलचे विवेक बनकर यांचा विजय

    45

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.23जुलै):- ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी ही राजकीयदृष्टया संवेदनशील ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक आज दि. २२ जूलै रोजी गुरुवारी पार पडली. यामध्ये विवेक सेवकदास बनकर हे सरपंचपदी निवडुन आले आहेत.ब्रम्हपुरी तालुक्यात जानेवारी महीन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले.यामध्ये गांगलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण निघाल होत.

    परंतु गांगलवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनूसूचित जमातीचा एकही सदस्य निवडुन आला नव्हता. त्यामुळे येथील सरपंचपद आतापर्यंत रिक्त होते. जिल्हाधिकारी यांनी आता नव्याने सरपंचपदाच्या आरक्षणाची घोषणा केली.यामध्ये अनुसुचित जाती सर्वसाधारण आरक्षण निघाले.

    त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली.यामध्ये विरूद्ध उमेदवाराला ३ मते तर काँग्रेस समर्थित पँनेलचे विवेक बनकर यांना ६ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे.सदर निवडणुक ही ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली होती.