राजु म्हस्के यांचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारने गौरव

23

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26जुलै):-राजु म्हस्के यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतज्योति राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने नुकतेच मुंबई येथील कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने सन्मानित करण्यात आले.अँड.कृष्णाजी जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून एम.व्ही.एल.ए.ट्रस्ट व ग्लोबल आचिवर्स अवॉर्ड २०२१ यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

त्याप्रमाणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक,औद्योगिक आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांचा भारत ज्योती राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा आष्टी येथील राजु म्हस्के यांना भारतज्योती राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.म्हस्के हे आ.विनायक मेटे साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या शिवसंग्राम हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक खचलेल्या पिचलेल्या घटकांना मदत करावी अशा सूचना दिल्या.

शिवसंग्राम हेल्पलाईन बीड व जयदत्त सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.म्हस्के यांना हा भारतज्योती राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आल्याचे कळताच ज्ञानेश्वर चौधरी,संदीप खकाळ सरपंच,दीपक सोनवणे,श्रीराम सोनवणे,विष्णू महाडिक,प्रफुल्ल महाडिक (फौजी),दादा धर्माधिकारी,बाळू बोरुडे,मयुर चव्हाण आदीने त्यांचे अभिनंदन केले आहे.