धोंडेगाव शिवारात संतप्त मुलाने वृद्ध पित्याचा कुऱ्हाड मारून केला निर्घुण खून

19

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि 27जुलै):- शेती कामावरून रागावल्याने संतप्त मुलाने आपल्या वृद्ध पित्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून निर्घुण खून केल्याची घटना गिरणारे नजीकच्या घोडेगाव शिवारात घडली याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी मुलास अटक केली आहे हरिचंद्र नामदेव बेंडकुळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे धोंडेगाव शहरातील इंदिरा नगर वस्तीत राहणारे नामदेव श्रावण बेंडकुळे(73) यांचा या घटनेत खून झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेत मशागत करताना थोरला मुलगा हरिचंद्र हलगर्जी पणा करतो या कारणातून वृद्ध पित्याने ठोकले होते.

यापूर्वी वडिलांकडून रागवली जायचे यामुळे संशयिताने हे कृत्य केले सोमवारी दिनांक 26 मध्यरात्री वडील नामदेव बेंडकुळे हे आपल्या घरात झोपलेला असतांना संतप्त मुलाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तुळशीदास अटक केली व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला