प्रा.डॉ. अनिल काळबांडे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

27

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.29जुलै):- येथील प्रख्यात साहित्यिक प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे, मराठी विभाग प्रमुख, मिलिंद महाविद्यालय, मुळावा यांच्या प्रज्ञासुर्याची साऊली, रमाई माऊली या बालचरित्राला शब्दांगण संस्था, चंद्रपूरच्या वतीने उत्कृष्ठ साहित्य निर्मितीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत सूर यांनी राज्यातून जवळपास २३८ साहित्यकृती ज्या मध्ये कविता, कथा, वैचारीक, समिक्षा, चरित्र अश्या साहित्याचा समावेश होता त्यातून निवड करून मराठीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रा. अनिल काळबांडे यांना देण्यास आला.

याही पूर्वी त्यांच्या साहित्याला ‘राजा ढाले वैचारीक लेखन पुरस्कार’, यवतमाळ, त्यांच्या ‘करूणेची ओल ‘ काव्यसंग्रहाला ‘अस्तितादर्श पुरस्कार, ‘ वाशीम, छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक स्मृती उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, नांदेड, जागतीक बौध्द धम्म परिषद, किनवटचा ‘प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार’ सह अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मराठी साहित्याला सातासमुद्रपार नेण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी थायलॅड, दुबई, मलेशिया,इंडोनेशिया, श्रीलंका,भुटान,तायवान या देश्यात शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मराठी साहित्यासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांनी १२ वी चे युवक भारती मराठी पुस्तकाच्या संपादक मंडळात काम केले असून मराठी विषयाचे पीएच डी . मार्गदर्शक म्हणून अनेक विद्यापीठात ते कार्य करीत आहे.