सोनसाखळी चोरटे 24 तासात गजाआड -127 ग्रॅम सोने दुचाकी मोबाईल जप्त

    37

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    नासिक(दि.30जुलै):- सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून 127 ग्रॅम सोने दुचाकी दोन मोबाईल जप्त केले आहेत चोरट्यांनी पंचवटी गंगापूर इंदिरानगर मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील सहा सोन साखळीचे गुन्हे व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली चौकशी त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे प्रकाश उर्फ तेरी कुमावत व पंकज आहेर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी वाहन चोरटे सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळ्याच्या सूचना पोलिसांना दिले आहेत पोलिसांना दिली आहे.

    त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांची माहिती काढून तपास सुरू केला 23 जुलै रोजी गंगापूर पोलीस ठाणे मध्ये तक्रारदार महिला रस्त्याने पायी जात होती त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकवल्ली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीवी फुटेज प्राप्त करून त्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान पोलीस हवालदार सचिन अजबे यांना सोनसाखळी चोरटे ची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रकाश कुमावत पंकज आहेर यांना अटक केली न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली