दगडाने ठेचून वीस वर्षे युवकाचा खून

22

🔺नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटना

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.30जुलै): – शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ वीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचलेल्या जखमा असल्यामुळे त्याचा खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असून या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.अक्षय वसंतराव करे वय- वीस असे मृतक युवकाचे नाव असून आज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर तुळजापूर महामार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलाच्या अलीकडे ज्ञानेश्वर कदम यांचे शेताजवळील कार्तिक ट्रेडिंग कंपनी च्या शेड समोर त्याचा मृतदेह शेतकऱ्यांनी पाहिला याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार आनंद वागतकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.प्रथम दर्शनी सदर युवकाच्या डोक्याला मार लागलेला व गंभीर अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर युवकाचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहे.

या प्रकरणात मृतकांच्या चार मित्रांना शंसयीत म्हणुन ताब्यात घेतले असुन अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, पि एस आय विनीत घाटोळ, संदीप ठाकुर करीत आहेत.