डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

21

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.3ऑगस्ट):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर आणि आंबेडकराईट हिस्ट्री कॉंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक व धार्मिक सुधारणा“ या विषयावर नुकतेच एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ.नितीन कोईली,संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.देवेश कांबळे,सचिव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर एज्यूकेशन सोसायटी, ब्रम्हपुरी हे होते. याप्रसंगी ब्रिज भाषण डॉ.संदेश वाघ,अध्यक्ष,इतिहास व पुरातत्व शास्त्र,अभ्यास मंडळ,मुंबई युनिव्हर्सिटी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजक डॉ.अझिझुल हक, प्राचार्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,ब्रम्हपुरी यांनी पाहुण्याचे स्वागत केले. या प्रसंगी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. मिता रामटेके, माजी प्राचार्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,ब्रम्हपुरी यांना “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार“ यांना प्रदान करण्यात आला.

या राष्ट्रीय चर्चासत्राची माहिती सांगून पाहुण्यांचा परिचय डॉ.रुपेश मेश्राम,इतिहास विभाग प्रमुख, यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुफान अवताळे आणि आभार डॉ. चंद्रकांत सरदार यांनी मानले. राष्ट्रीय चर्चासत्राचे पहिले सत्र “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक सुधारणा” या विषयावर मुख्य मार्गदर्शक डॉ. प्रीती खंडारे ,इतिहास विभाग,हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ,सागर,मध्यप्रदेश यांनी बाबासाहेबांच्या सर्वांगीण सामाजिक सुधारणेवर प्रकाश टाकला.या सत्राचे मुख्य अध्यक्ष डॉ.हरी नारायण जमाले,अध्यक्ष,इतिहास अभ्यास मंडळ,एस एन डी टी युनिवर्सिटी हे होते. सत्राचे संचालन डॉ. डी.बी.फुलझेले तर पाहुण्याचे आभार डॉ.रुपेश मेश्राम यांनी मानले.

राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसरे सत्रात “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धार्मिक सुधारणा”या विषयावर मुख्य मार्गदर्शक डॉ.इंदिरा सूर्यवंशी,सहाय्यक प्राध्यापक,उस्मानिया युनिवर्सिटी,हैद्राबाद आणि डॉ. संजय गायकवाड,एम.एच.महाडिक आर्टस व कॉमर्स कॉलेज मोडीन्ब,सोलापूर आपले विचार व्यक्त केले. सत्राचे अध्यक्ष डॉ.रश्मी बंड व इतिहास विभाग प्रमुख,गोंडवाना युनिवर्सिटी,गडचिरोली होत्या.कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजेश कोसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.जगदीश मेश्राम यांनी केले.राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ.संतोष बन्सोड,अध्यक्ष,इतिहास अभ्यास मंडळ,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांनी संबोधन केले. विशेष अतिथी डॉ. स्निग्धा कांबळे यांनी या प्रसंगी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

सत्राचे अध्यक्ष डॉ.एस.बी.भगत माजी प्राचार्य,अमरावती हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.एम.डांगे यांनी तर आभार डॉ.लोकेशकुमार नंदेश्वर यांनी मानले .या एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये प्राध्यापक,अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी यांनी मोठ्या संख्येने घेतला. या राष्ट्रीय सेमिनारचे समन्वयक डॉ. रुपेश मेश्राम,इतिहास विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,ब्रम्हपुरी,डॉ.संदेश वाघ,राष्ट्रीय अध्यक्ष,आंबेडकराईट हिस्ट्री कॉंग्रेस व डॉ.संतोष बन्सोड,राष्ट्रीय सचिव,आंबेडकराईट हिस्ट्री कॉंग्रेस हे होते.