जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच ट्रॅक्टरची काढलेली बॅटरी पुन्हा बसवली..!

23

🔸तहसिलदारांची सावरासावर कार्यवाहीसाठी महिलेचा उपोषणाचा इशारा

✒️सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9822995466

उमरखेड(दि.3ऑगस्ट):: – तहसिल आवारातील जप्त केलेल्या ट्रॅक्टरमधील बॅटरीसह इतर साहित्य काढून नेणाऱ्या शासकिय वाहनाच्या ड्रायव्हरसह त्यास आदेशित करणाऱ्या तहसिलदाराविरुद्ध त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस कार्यवाही करावी अशी तक्रार शेतकरी महिलेने करताच ट्रॅक्टरमधील काढलेली बॅटरी पून्हा बसवून जणुकाही घडलेच नाही असा आव आणीत प्रकरणाची सावरा सावर करणाऱ्या तहसिलदारा विरुद्ध कार्यवाही करून त्यांची हकालपट्टी करावी.
अन्यथा दि . १४ ऑगस्टपासून उमरखेड उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर मला आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा अशी तक्रारकर्त्या अन्नपूर्णा बनसोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

मुरुमाचे उत्खनन करून ब्राम्हणगाव ते चातारी रस्त्यावर अवैधरित्या वाहतूक करतांना उमरखेड तहसिलदारांनी श्रीमती अन्नपूर्णा बनसोड यांचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर जप्त करून ते तहसिल आवारात लावले होते. त्यानंतर दंडात्मक कार्यवाही करून दंडापोटी त्यांनी १ लाख ७ हजार ७७५ रुपये चालानचा रितसर भरणाही केला होता . त्यानंतरही टूँक्टर सोडण्यात आले नव्हते.या दरम्यान तहसिलदारांनी श्रीमती बनसोड यांना उद्धटपणाची वागणूक दिली असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

दि .२८ जुलै रोजी त्या वाहनातील बॅटरी व इतर साहित्य तहसिलदार आनंद देऊळगावकर यांच्या शासकिय वाहनाचे खासगी चालक सागर बारे यांनी तहसिलदारांच्या फर्मानानुसार काढले असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी या अन्याया बाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करून जप्तीच्या वाहनातील साहित्य काढून नेल्याप्रकरणी संबंधितां विरुद्ध पोलीस कार्यवाही करावी अशी तक्रार दि 30 जुलै रोजी केल्यानंतर सदर प्रकरणाची सावरासावर करीत ट्रॅक्टर मधील काढलेले सामान बसविल्या नंतर नायब तहसिलदार श्री . डांगे यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी पंचनामा केला व ब्राम्हणगांव येथील तलाठी प्रदिप जयस्वाल यांच्या मार्फत सकाळी ११ वाजताचे सुमारास त्यांना ट्रॅक्टर वाहन घेऊन जाण्या बाबतची नोटीस दिली.

जप्तीच्या वाहनांचे साहित्य काढून तक्रार केल्यानंतर ते जसेच्या तसे बसविले जाते ही निव्वळ लबाडी असून माझी तक्रार खोटी ठरविण्यासाठी हा खटाटोप तहसिलदार यांनी केला असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोटारड्या तहसिलदारां विरुद्ध कठोर कार्यवाही करून त्यांची हकालपट्टी करावी.

अन्यथा दि १४ ऑगस्टपासून मला उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा श्रीमती अन्नपूर्णा बनसोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे .