वाणी-लेखणीच्या जोरावर प्रबोधन करणारे आण्णा भाऊ साठे जागतिक मानवतावादी लेखक आहेत-डॉ. बिदिन आबा (मॉरिशस)

28

✒️सचीन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3ऑगस्ट):-आण्णा भाऊ साठे हे मराठी भाषेतील कोहिनुर हिऱ्याप्रमाणे अनमोल आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते गरिबीमध्ये जन्माला येऊनसुद्धा कर्तृत्वाने ते जगाला वंदनीय ठरले.जातिभेदाला सुरुंग लावून समताधिष्टीत समाजनिर्मित्तीसाठी आण्णाभाऊनी आपल्या वाणी लेखणीच्या जोरावर जागतिक पातळीवर मानवतावादी विचार असे प्रतिपादन मॉरिशस येथील माजी मराठी विभाग प्रमुख हात्मा गांधी इन्स्टिट्यूट मराठी भाषक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. बिदिन आबा यांनी केले.स्वप्न स्टडीज सातारा यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या आण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन व्याख्यानमालेच्या अध्यक्ष पदावरून डॉ. बिदिन आबा बोल्ट होते.

जागतिक पातळीवरील या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये दुबई,जर्मनी,सिगापूर,दरबन-दक्षिण आफ्रिका,कराची-पाकिस्तान व मॉरिशस या विविध देशातील आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक सहभागी झाले होते.
पाकिस्तान- कराची येथील विशाल रजपूत यांनी आण्णा भाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला तर मॉरिशस येथील युवा संशोधिका पूर्वशा सखू म्हणाल्या आमच्या देशाची राष्ट्रभाषा क्रियोल अशी असली तरी आम्ही मूळचे मराठी भाषिक आहोत दोनशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज महाराष्ट्रातून येऊन मॉरिशस ला कायमचे स्थायिक झाले.तरीही मरातजी साहित्य,संस्कृती याचे आम्ही संरक्षण-संवर्धन करीत आलो आहोत त्यामुळे आण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या लेखकाच्या साहित्यकृती आजही आम्हाला मॉरिशस करना मोहित करतात.आण्णाभाऊनी जगाच्या इतिहासात अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या.आण्णाभाऊंचे साहित्य हे सुर्यासारखे तेजस्वी आहे.

मी मॉरिशस मध्ये रहात असले तरी मला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे.डॉ. होमराजन गोवरिया (मॉरिशस)हे या व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना म्हणाले अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा एक आनंददायी सोहळा आहे.आम्ही मॉरिशस विध्यापिठात आंआभाऊ साठे यांच्या “फकिरा” कादंबरीचा पदवी परीक्षेसाठी समावेश केला आहे.अण्णाभाऊ हे परिपूर्ण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
यावेळी दुबई येथून बोलताना किशोर मुंडे म्हणाले-आण्णाभाऊंचा विचार हा व्यक्ती केंद्रित असून जातिभेदापलीकडे जाऊन माणुसकीचा प्रचार करतो म्हणून तो साहित्यादृष्ट्या श्रेष्ठ दर्जाचा ठरतो आहे.यावेळी पाकिस्तान -कराची येथील राजकुमार यांनीही आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
आण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक डॉ.शरद गायकवाड (कोल्हापूर) हे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना म्हणाले न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असणारे नायक-नायिका आण्णाभाऊनी जगासमोर मांडले.

कुसाबाहेरचे जातविशवं त्याची तीव्रदाहकता,शोषितजीवन,आणि फुले,आंबेडकरी विचार आपल्या साहित्यात मांडला.म्हणूनच आण्णाभाऊंचे साहित्य जगातल्या सत्तावीस देशांच्या विविध भाषेतून अनुवादित झालेले आपणास पहायला मिळते.
डॉ.गायकवाड पुढे म्हणाले कोणत्याही पुरुषाला जात आणि धर्माच्या भिंगातून न पाहता केवळ माणूस म्हणूनच पाहायला हवे तरच त्याच्या कार्यकर्तृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो.
दरम्यान मुबंई येथील सीमा दाभाडकर यांनी यावेळी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त टिळकांच्या जीवनातील निवडक घटना विशद केल्या.स्वप्न स्टडीज साताराचे दिलीप पुराणिक यांनी या ऑनलाईन व्याख्यानमालेचे सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक केले तर सूत्र संचालन व उपस्थितांचे आभार स्वप्नील पुराणिक यांनी मानले.