वाढदिवसाच्या निमित्ताने हिरालाल पेंटर कडून साड्या वाटप व सोबत वृक्षारोपण

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4 ₹ऑगस्ट):- झाडीपट्टी रंगभूमीवरील विनोदी कलावंत हिरालाल पेंटर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालडोंगरी येथील गोपाळ वस्तीतील महिलांना साड्याचे वाटप केले. मागील काही वर्षांपासून हिरालाल पेंटर आपला वाढदिवस मालडोंगरी येथील गोपाळ वस्तीत जाऊन साजरा करतात. तसेच मागील काही वर्षांपासून ते तेथील वस्तीत वृक्षारोपण करीत आहेत.

गोपाळ वस्तीतील महिलांनी आजपर्यंत लावलेल्या वृक्षांची जोपासना केल्या प्रित्यर्थ यावर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून त्या महिलांना साडीचोळी भेट देत तिथे वृक्षारोपण केले. यावेळी मालडोंगरी च्या सरपंच मंजुषा ठाकरे पत्रकार नितीन येनूरकर गोवर्धन दोनाडकर विशाल सहारे गजेंद्र सहारे बंडू प्रधान डेव्हिड ठाकरे पटवारी राऊत भोजराज पिलारे कमलेश ठाकरे दर्शन उरकुडे ग्रामसेवक अलोने उपस्थित होते.