ग्रामगिता महाविद्यालयाचे प्रा.सुमित वावरे आचार्य पदवीने सम्मानित

    33

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.8ऑगस्ट):-स्थानिक ग्रामगिता महाविद्यालय चिमूर येथे प्राणीशास्त्र विभागात कार्यरत प्राध्यापक सुमेध वावरे याना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने नुकतीच पीएच.डी. प्रदान केली आहे.लिमनोलॉजिकल स्टडी टू डिलिनीएट दी बेसलाइन स्टेटस ऑफ लैक या विषयावर त्यानी वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयातिल मार्गदर्शक आर.आर. कामड़ी यांच्या मार्गदर्शन शोध प्रबंध पूर्ण करून गोंडवाना विद्यापीठात सादर केला होता.

    त्यांच्या यशा बदल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमीर धमानी, डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ.ठवकर,डॉ युवराज बोधे,प्रा. नागेश ढोरे,प्रा. बिजनकुमार शिल, प्रा.हूमेश्वर आनंदे प्रा. राजू रामटेके ने अभिनंदन केले आहे.