उद्योजक तथा पत्रकार विजयकुमार वाव्हळ “छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड” ‘बेस्ट बिझनेसमॅन’ ने सन्मानित

23

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी९शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8ऑगस्ट):-मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराईचे नामांकित उद्योजक दैनिक जय महाभारत चे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ यांना DPIAF बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, दार्शनिक मुंबई, जी. एस. ग्रुप, ब्राईट मीडिया प्रा. ली. मजान ग्रुप ऑफ सिनेमा मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड उत्कृष्ट उद्योजक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कल्याणजी जना आणि दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स (DPIAF) टिम यांच्या तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येते.रंगशारदा ऑडीटोरीअम, बांद्रा पश्चिम, मुंबई, येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला ज्यामध्ये व्यावसाय, सामाजिक, सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी कामगिरी व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

त्यावेळी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नामांकित उद्योजक विजयकुमार वाव्हळ यांना त्यांच्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या भारत गॅस एजन्सी द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून धुरमुक्त भारत करण्यासाठी केंद्रसरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गोरगरीब अनुसूचित जाती, आदिवासी समुदायातील कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देऊन एक उच्चांक गाठला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गरीब, आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, वनक्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देऊन सक्षमपणे योजना राबवल्याबद्दल व अनेक उद्योगात म्हणजेच समिक्षा जिनिंग अँड ऑईल इंडस्ट्रीज, दै. महाभारत वृत्तपत्र, जय इन्फ्रा प्रा. ली. कंपनी च्या माध्यमातून उद्योजक जगतात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवार्ड “उत्कृष्ट उद्योजक” (Best Businessman) ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.