धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या टोकरे कोळी, कोळी,महादेव मल्हार कोळी, डोंगर कोळी या जमातींना खावटी मिळाल्या पाहिजे

    34

    ?वाल्या सेना ग्रुप धुळे नंदुरबार जिल्हा तर्फे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आले

    ✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

    दोंडाईचा(दि.9ऑगस्ट):- धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या टोकरे कोळी ढोर कोळी कोळी महादेव मल्हार कोळी डोंगर कोळी या सर्व जमातींना खावटी मिळाली पाहिजे असे निवेदन धुळे जिल्हा अधिकारी येथे वाल्या सेना ग्रुप धुळे व नंदुरबार च्या वतीने देण्यात आले.महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग मंत्रालय 9 सप्टेंबर 2020 रोजी राज्यात उद्धवलेल्या कोरोना प्रदुभर्वाच्या पार्श्वभूमीवर 47 आदिवासी जमातींच्या कुटुंबियांना खावटी योजना 2020 ते 21 वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे काही जमातींच्या द्रेष भावनेने सर्वे करण्यात आला नाही व ज्यांच्या झाला त्यांचे फॉर्म मुद्दा मंजूर करण्यात आले नाही व मोजके जमातींच्या फॉर्म मंजूर करण्यात आले त्यातील भील पावरा तडवी यांच्या सर्वे करण्यात आला व त्यांचे फॉर्म मंजूर करण्यात आले.

    आदिवासी विभागाकडून आदिवासींवर अन्याय होत आहे मजुरी करणाऱ्या आदिवासी वर अक्षरक्ष उपासमारीची वेळ आली आहे त्यांना नाम सदृष्या किंवा बोगस आदिवासी म्हण्याचा अधिकार पण आदिवासी मंत्र्यांना नाही किंवा कोणतेही संघटनेला नाही या आदिवासींचे अनुदान चे पैसे लाटण्याचे काम चालू आहे. संविधानिक अधिकार आदिवासींना मिळालाच पाहिजे संविधानात्मक अधिकार देणे आदिवासींच्या जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना खावटी मिळाली पाहिजे एकही आदिवासी कुटुंबे या योजनेपासून वंचित राहायला नको. विधवा भूमिहीन यांच्याकडे घरही नाही जातीचे प्रमाणपत्र नाही वैधता बसले नाहीत टोकरे कोळी ढोर कोळी कोळी महादेव मल्हार कोळी डोंगर कोळी अशा आदिवासी बांधवांना तात्काळ खावटी मंजूर करावी.

    अशी बांधणी वाल्या सेना धुळे व नंदुरबार तर्फे करण्यात आली.या आंदोलनात वाल्या सेना ग्रुपच्या मार्गदर्शक सौ गीतांजली ताई कोळी, गोपाल कोळी, देविदास चव्हाण, कल्पना कोळी, आनंदा तवर, न्याहाळोदचे रवींद्र कोळी, दोंडाईचा चे संजय कोळी व सचिन कोळी,राहुल चव्हाण आकाश कोळी, तिनु कोळी, रुपेश कोळी, दीपक कोळी,धर्मराज कोळी, विनय कोळी,अमोल कोळी आप्पा कोळी भरत कोळी,हेमंत कोळी,शिवाजी कोळी, नरेश कोळी,शरद कोळी, भिका कोळी,बापू कोळी आदी सहभागी झाले होते.