गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    47

    ?मरसुळच्या नऊ विद्यार्थ्यांचा सावनकुमार आय. ए. एस, यांच्या हस्ते सत्कार

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.10ऑगस्ट):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुसद प्रकल्पातील इयत्ता दहावी  बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त पुसद तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा हर्षी येथे आयोजित करण्यात आला होता महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मरसुळ तालुका पुसद येथील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रकल्पातून प्रथम आल्याबद्दल नउ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

    यामध्ये वर्ग दहावीतील विशाखा टाले.९३.४० टक्के गोपाल शेळके ९०.८० टक्के १२ विज्ञान शाखेतून प्रथम शुभम दुम्हारे.९०.६७ टक्के श्रीकांत खोकले ८९.१७ टक्के गौरव मोहाङे.८९.१७ टक्के अविनाश ङाखोरे८९.१७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे आश्रम शाळेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत प्रकल्पातील पंधरा गुणवंत धारक विद्यार्थ्यांपैकी मरसुळचे नऊ विद्यार्थी गुणवंत धारक ठरले.पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी मा. सावनकुमार साहेब आय.ए.एस. तसेच ताई गीतांजली कदम.(स.प्र.अ.) अहीर साहेब. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    संस्थेचे आधारस्तंभ मा.शिवाजीराव मोघे( माजी मंत्री )यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळा करीत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

    तसेच अध्यक्ष जितेंद्रभाऊ मोघे. सचिव ज्ञानेश्वर तङसे.संचालक लीलाधर मळघणे. शाळेचे मुख्याध्यापक ए.जी. सय्यद. व सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.