गुणकारी व उपयुक्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन

37

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि.13ऑगस्ट):-शाश्वत कृषी विकासाच्या दृष्टीने कृषी विभाग व आत्मा यांच्या कडून विविध योजना अंतर्गत उपक्रम राबविले जातात .त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9आँगष्ट ते 15 आँगष्ट रानभाजी महोत्सव सप्ताहा चे आयोजन करण्यात आले आहे.रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे.

प्रकल्प संचालक आत्मा श्री नवनाथ कोळपकर व उपविभागीय कृषी अधिकारी डॉक्टर प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका कृषी अधिकारी महागाव श्री विजय मुकाडे यांच्या निगराणीत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन 2021- 22 अंतर्गत तहसील कार्यालय परिसर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .श्री राणे साहेब तहसीलदार महागाव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तालुक्यामध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळे भाज्या ,फुल भाज्या ,इत्यादी रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात. व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत .

या रानभाज्या चे महत्व लोकांपर्यंत पोहोचणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता रानभाज्यांचे प्रदर्शन महागाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय परिसर येथे तालुका कृषी अधिकारी महागाव यांनी आयोजित केले. या रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व पाककृती इत्यादी माहिती शहरी भागातील ग्राहकांना होण्याच्या दृष्टिकोनातून रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे रानभाज्या ना ओळख मिळवून त्याची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्‍य होणार आहे .

त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ होण्यास मदत होईल या महोत्सवात महागाव तालुक्यातील करटुले, सुरजकंद, अंबाडी, बांबूचे कोंब, आघाडा ,केना, पाथरी ,आळु वडी, शेवगा ,कपाळफोडी, कुर्डू, उंबर, वाघाटे ,चिवळ ,काठे मोड ,रेशीम, काढा ,हादगाव,गुळवेल, हडसन या प्रकारच्या विविध रानभाज्यासह करंजी ,धारकांन्हा,वडद,बोरी, वाकोडी, हिवरा,हिवरी,थार; बुद्रुक वरोडी, वेणी,गुंज,हिवळणी,सवना,अशा विविध गावातील शेतकरी ,कृषिमित्र व आदिवासी शेतकरी सहभागी झाले. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नेहमी असे उपक्रम राबविण्यात यावे असे मत व्यक्त करत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

रानभाजी महोत्सवाचे व्यवस्थापनात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अविनाश वाघमारे सर्व कृषी सहाय्यक, कृषि मित्र ,शेतकरी यांनी केले .कार्यक्रमास श्री विजय मुकाडे तालुका कृषी अधिकारी,नायबतहसीलदार अदमुलवाड साहेब ,मंडळ कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे, बि.डी मेंडके, जे .डी .भालेराव पाईकराव कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी सहाय्यक ,कृषिमित्र,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.