खंडाळा येथे सांकृतिक सभागृहाचे भुमीपुजन

19

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17ऑगस्ट) :-चिमुर विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या स्थानिक विकास निधितुन संत जगनाडे चौक खंडाळा येथे सांस्कृतिक सभागृहाकरीता 25 लाखाचा निधि प्राप्त झाला . त्याचे दि . 15/08/2021 रोजी भुमीपुजन कार्यक्रम पार पाडण्यात आला.

या भुमीपुजना प्रसंगी माजी जि.प. उपाध्यक्ष व विमान जि.प. सदस्य क्रिष्णाभाऊ सहारे , माजी प.स.उपसभापती व विमान प.स.सदस्य विलासभाउ उरकुडे , सरपंच सौ.अचर्ना राजेश डेंगे , माजी सरपंच श्री.नरेंद्र नानाजी राखडे , ग्रा.पं.सदस्य श्री.अमरदिप वासुदेव राखडे , उपसरपंच श्री . नंदकिशोर मुखरू राखडे , ग्रा.प.सदस्य श्री.अरूण लक्ष्मण अलोणे , प्रदिप माटे , शालु राखडे , पुष्पलता राखडे , दिपाली डेंगे , विदया मेश्राम , माजी उपसरपंच संदिप भिमराव माटे , हरी राखडे , विनायक राखडे , बुथ अध्यक्ष , मनोहर राखडे , गोपाल राखडे , कमलेश राखडे , अमरदिप राखडे , प्रकाश सहारे , बालाजी राखडे सर्व तेली समाजाचे नागरीक व ग्रामस्थांच्या उपस्थित पार पाडला . तेली समाज खंडाळा व सर्व ग्रामस्थांनी या भुमीपुजनाप्रसंगी मा . आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे सदर बांधकामाकरीता निधि उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .